अर्थमंत्र्यांच्या भाषणात मंदावलेली उत्पन्न वाढ, घटलेली खाजगी गुंतवणूक आणि खालावलेली निर्यात, या समस्यांची कारणमीमांसा तर सोडाच, पण साधा उल्लेखही नव्हता!

संसदेतील अर्थसंकल्पीय चर्चेचे उत्तर देताना अर्थव्यवस्था योग्य मार्गावर आहे, असा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला असला तरी तो विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्याच्या त्यांच्या रणनीतीचा एक भाग असावा. कारण अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी एक दिवस आधी सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षणात सध्याचे व्यापार वातावरण आणि परिणामी कुंठित झालेली निर्यात आणि बँक व वित्तसंस्थांचे अनारोग्य ही दोन कारणे नमूद केली होती.......